News Flash

नेत्यांची नातीगोती अन् अनिश्चित वातावरण

भाजपमध्ये पुन्हा दुर्गे-घोळवे यांच्यात उमेदवारीची स्पर्धा आहे, त्यावर खासदारांना तोडगा काढावा लागणार आहे.

प्रभाग क्र. १०, शाहूनगर-संभाजीनगर-मोरवाडी-विद्यानगर

भाजपचे खासदार अमर साबळे, शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर, राष्ट्रवादीचे माजी महापौर आझम पानसरे, पक्षनेत्या मंगला कदम, माजी आमदार अण्णा  बनसोडे या नेत्यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबातील सदस्यासाठी सुरू असलेली मोर्चेबांधणी हाच या प्रभागातील मुख्य चर्चेचा विषय आहे. अनेक आजी-माजी नगरसेवक निवडणूक िरगणात येणार असल्याने अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ‘मॉडेल वॉर्ड’ म्हणून सातत्याने चर्चेत असलेला भाग या प्रभागात असून पालिकेच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या मंगला कदम सर्वाच्याच रडारवर राहतील, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.

चिंचवडचे संभाजीनगर, शाहूनगर, विद्यानगर, दत्तनगर, एचडीएफसी कॉलनी, मोरवाडी, म्हाडा, लालटोपीनगर असा विस्तृत पट्टा असलेल्या या प्रभागात राष्ट्रवादीचे चार व शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत. सोसायटय़ा व झोपडपट्टी असा संमिश्र भाग समाविष्ट असून खुला गट, सर्वसाधारण महिला, ओबीसी आणि अनुसूचित महिला असे प्रभागातील आरक्षण आहे. उमेदवारीच्या बाबतीत सर्वच गटात अनिश्चित वातावरण आहे. खासदार साबळे यांना मुलगी वेणू हिला राजकारणात आणायचे आहे, त्यासाठी या प्रभागात त्यांची चाचपणी सुरू आहे. त्याचप्रमाणे, अण्णा बनसोडे यांनी पत्नी प्रिया यांना िरगणात उतरवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आझम पानसरे यांनी मुलगा निहाल यास राजकारणात आणण्यासाठी गेल्या वेळीच प्रयत्न केले होते. यंदा त्यांची या प्रभागात चाचपणी सुरू आहे. मंगला कदम यांचे मुलगा कुशाग्रसाठी प्रयत्न सुरू आहेत.  बाबर परिवारात उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. नगरसेविका शारदा बाबर, योगेश बाबर, अमित बाबर यांच्यापैकी नेमके कोण िरगणात उतरणार आहे, याची अद्याप निश्चिती नाही. माजी नगरसेवक महेश चांदगुडे यांनी पत्नी सुप्रियासाठी मोर्चेबांधणी केली आहे. खुल्या गटात तीव्र स्पर्धा राहणार आहे. पूर्वी शिवसेनेत असलेले तुषार िहगे यंदा भाजपच्या तिकिटासाठी प्रयत्नशील आहेत. नगरसेवक नारायण बहिरवाडे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, कामगार नेते केशव घोळवे आदी ओबीसी गटात भवितव्य आजमावणार आहेत. राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांचे आपापसात बिलकूल पटत नाही, हे उघड गुपित आहे. भाजपमध्ये पुन्हा दुर्गे-घोळवे यांच्यात उमेदवारीची स्पर्धा आहे, त्यावर खासदारांना तोडगा काढावा लागणार आहे. उमेश चांदगुडे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. प्रभागात भाजप-शिवसेना युती झाल्यास वेगळी आणि न झाल्यास त्याहून वेगळी परिस्थिती राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 3:56 am

Web Title: pimpri ward no 10
Next Stories
1 ‘आकुर्डीतही सापांसाठी ‘रेस्क्यू’ केंद्र आवश्यक’
2 आता तरी ‘घडय़ाळ’ द्या, बंडखोरी करायला लावू नका!
3 ब्रॅण्ड पुणे : प्रचंड स्पर्धेतही टिकून राहिलेली ‘ब्यूटिक’ सौंदर्यप्रसाधने
Just Now!
X