31 October 2020

News Flash

‘खडकवासला’त वीजनिर्मिती बंद

आधी तांत्रिक कारणांमुळे आता अपुऱ्या कामगार संख्येचे कारण

आधी तांत्रिक कारणांमुळे आता अपुऱ्या कामगार संख्येचे कारण

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या खडकवासला धरणातून वीजनिर्मितीचे काम कामगारांअभावी ठप्प झाले आहे. याबाबतची चाचणी फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली होती. मार्चपासून प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू करण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे आणि आता कामगारांअभावी वीजनिर्मिती अद्याप चालू झालेली नाही.

खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर वीजनिर्मिती करण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बील्ड, ऑपरेट, ट्रान्स्फर – बीओटी) या तत्त्वावर हे काम होणार असून त्याची चाचणी घेण्यात आली आहे.

पानशेत आणि वरसगाव या दोन्ही धरणांतून खडकवासला धरणात पाणी सोडताना विद्युतनिर्मिती केली जाते. त्याप्रमाणे खडकवासला धरणातूनही वीजनिर्मिती करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार नियोजनाचे काम संपून चाचणी घेण्यात आली आहे. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव वीजनिर्मिती अद्याप सुरू झालेली नव्हती. तसेच टाळेबंदीचा परिणाम म्हणून कामगार, मजूर उपलब्ध होत नसल्याने काम करण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपअभियंता वामन भालेराव यांनी दिली.

दरम्यान, संबंधित कंपनीला कालवा बंद करून खोदाईचे काम करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.

महापालिका कालव्यातून पाणी घेत असल्याने तो बंद करून पॉवर हाऊसचे काम करणे शक्य होत नव्हते. महापालिकेच्या नवीन बंद जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पालिका कालव्याऐवजी नव्या जलवाहिनीतून पाणी घेत आहे. त्यामुळे पॉवर हाऊसच्या कामासाठी कालवा बंद करण्याची अडचण दूर झाली आहे. प्रकल्पाचे काम ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाले असून कामगार, मजूर उपलब्ध झाल्यानंतर उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.

शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर वीजनिर्मिती शक्य

खडकवासला धरणातून कालव्यात शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर त्याच्या सुरुवातीलाच पॉवर हाउस बांधण्यात आले असून जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करणे शक्य झाले आहे. वीज तयार झाल्यानंतर ते पाणी पुन्हा कालव्यात सोडले जाणार आहे. वर्षांतून कालवा १७० दिवस सुरू असतो, त्यामुळे शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर वीजनिर्मिती करता येणे शक्य  आहे. वीज तयार झाल्यानंतर ती महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित किंवा महानिर्मितीला (महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि.) विकत देण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 12:32 am

Web Title: power generation work from khadakwasla dam come to a standstill due to lack of workers zws 70
Next Stories
1 Coronavirus : सक्रिय बाधितांचे प्रमाण २७ टक्यांवरून १९ टक्यांवर
2 स्वच्छ सेवकांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा प्रस्ताव
3 गौरी-गणपतीच्या खरेदीसाठी भुसार बाजारात निरुत्साह
Just Now!
X