25 February 2020

News Flash

पुणे : गणपती विसर्जन मिरवणूक, वाहतूक मार्गांमध्ये बदल; १७ रस्ते बंद

मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग व परिसरातील १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद

लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आज पुण्यात मोठमोठ्या विसर्जन मिरवणुकी निघणार असून त्यासाठी शहरातील वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग व परिसरातील १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्येही वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी कोणत्या रस्त्याने वाहतूक सुरू आहे. कोणत्या ठिकाणाहून वाहतूक वळविण्यात आली आहे, याबाबत माहिती नागरिकांना ऑनलाइन पाहता येणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी पुणे पोलिसांनी https://www.punetrafwatch.com ही वेबसाइट सुरू केली आहे.

कोणते मार्ग बंद –
जंगली महाराज मार्ग : झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक.
कर्वे मार्ग : नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक.
फग्युर्सन मार्ग : खंडोजी बाबा चौक ते फग्युर्सन कॉलेज मुख्य प्रवेशद्वार.
भांडारकर मार्ग : पी. वाय. सी जिमखाना ते गुडलक चौक, नटराज चौक.
टिळक मार्ग – जेधे चौक ते टिळक चौक.
शास्त्री मार्ग – सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक.
सोलापूर मार्ग – सेव्हन लव्ह्‌‌ज चौक ते जेधे चौक.
प्रभात मार्ग – डेक्कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक.
पुणे सातारा मार्ग – व्होल्गा चौक ते जेधे चौक.
शिवाजी मार्ग – काकासाहेब गाडगीड पुतळा जंक्शन ते जेधे चौक.
लक्ष्मी मार्ग – संत कबीर चौकी ते टिळक चौक.
बाजीराव मार्ग – बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक.
कुमठेकर मार्ग – टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक.
गणेश मार्ग – दारूवाला पुल ते जिजामाता चौक.
केळकर मार्ग – बुधवार चौक ते टिळक चौक.
गुरु नानाक मार्ग – देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक, गोविंद हलवाई चौक.

First Published on September 12, 2019 11:26 am

Web Title: pune ganpati immersion processions changes in traffic route sas 89
Next Stories
1 काय आहे ‘खुनी गणपती’च्या विसर्जन मिरवणुकीचा इतिहास?
2 म्यानमारमध्येही मराठमोळ्या पद्धतीनं गणेशोत्सवाची धूम
3 गणेश विसर्जनाला हलक्या पावसाची शक्यता
Just Now!
X