News Flash

पुणे : करोना नियमांचं उल्लंघन करणं हॉटेल चालकास पडलं महागात ; भरला एक लाख रुपये दंड!

पुन्हा असा प्रकार झाल्यास हॉटेल सील केले जाणार

करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार मार्फत अनेक उपाय योजना करण्यात येत आहे. मात्र अनेक नागरीक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील भवानी पेठेतील हॉटेल मिलनमध्ये ४० ते ५० नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था हॉटेल चालकाकडून करण्यात आल्याने, महापालिकेने हॉटेल मालकाकडून १ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईची चर्चा शहरात चांगलीच रंगल्याची पाहण्यास मिळाली.

करोनाबाधित रुग्णांची संख्या अद्याप कमी झालेली नसल्याने, राज्यभरात ३१ मे अखेर पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. त्या दरम्यान अनेक गोष्टीवर निर्बंध लादण्यात आले असून त्याचाच एक भाग असलेला हॉटेल व्यावसायिकांना केवळ पार्सल सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र पुण्यातील भवानी पेठेतील हॉटेल मिलनच्या मालकाने नियमांच उल्लंघन करीत हॉटेलमध्ये ४० ते ५० नागरिकांना प्रवेश देऊन, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. या बाबतची माहिती भवनी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावर त्यांनी हॉटेल मालकास करोना नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी १लाख रुपयांचा दंड आकारला असून, त्याचा धनादेश देखील घेण्यात आला आहे. यापुढे अशी घटना झाल्यास हॉटेल सील केले जाईल, अशी समज देण्यात आल्याचे सहायक आयुक्त सोमनाथ बनकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 7:30 pm

Web Title: pune hotel operator has to pay rs 1 lakh fine for violating corona rules msr 87 svk 88
Next Stories
1 नव्या वर्षात सामायिक अभ्यास पद्धती!
2 बरे झाल्यानंतरही १०० दिवस काळजीचे!
3 सर्वाच्या लसीकरणाची घाई हीच चूक!
Just Now!
X