25 January 2021

News Flash

पुण्यात कोचिंग क्लास सुरु करण्यासंदर्भात महानगर पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

काय झाला निर्णय?

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाउन करण्यात आल्यानंतर पुण्यात विविध आस्थापनांबरोबर शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले. पण त्यानंतर मिशन बिगिन अगेन अंतर्गत टाळेबंदी शिथिल करत पुण्यात विविध गोष्टी सुरु झाल्या. आता पुण्यात उद्यापासून कोचिंग क्लासेस आणि प्रशिक्षण संस्था सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

काय आहेत नियम व अटी
– पुणे महानगरपालिका प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व शैक्षणिक संस्था कौशल्य विकास, टायपिंग व संगणक प्रशिक्षण संस्था सॅनिटायझेशन तसेच सोशल डिस्टन्सिंग बाबतच्या मार्गदर्शक सूचना नियमांचे पालन करुन उद्यापासून सुरु करण्यास परवानगी.
– पुणे महानगरपालिका प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील इयत्ता ९ वी पासून पुढील कोचिंग क्लासेस सॅनिटायझेशन तसेच सोशल डिस्टन्सिंग बाबतच्या मार्गदर्शक सूचना नियमांचे पालन करुन उद्यापासून सुरु करण्यास परवानगी.
– विद्यार्थ्यांना प्रवेश देताना थर्मल गनद्वारे नियमित तपासणी करावी लागेल.
– मास्क वापर बंधनकारक राहिलं.
– सर्व संस्थांमधील प्रशिक्षक व व्यवस्थापन कर्मचारी यांची कोविड-१९ साठीची RTPCR चाचणी करावी लागेल.
– प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन मशीन उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहिलं.
– दोन विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग अंतर राखणे बंधनकारक राहीलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 8:04 pm

Web Title: pune mahanagar palika allow to start coaching classes svk 88 dmp 82
Next Stories
1 पुणे-बंगळुरू महामार्गावर पाच अपघात
2 धक्कादायक! कुटुंबियांसोबत पुण्यातल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती तरुणी, पण वेटरने…
3 पुणे : डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या तरुणाने केला बलात्कार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Just Now!
X