रेल्वे व्यवस्थापकांची ग्वाही; ९१वा वर्धापन दिन साजरा

पुणे रेल्वे स्टेशनची इमारत अधिक चांगल्या प्रकारे जतन होईल आणि या वास्तूला अधिक चांगले रूप देण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती पुणे विभागाचे रेल्वे व्यवस्थापक बी. के. दादभोय यांनी बुधवारी दिली.

भारतीय रेल्वेच्या इतिहासात महत्त्वपूर्ण असलेल्या पुणे रेल्वे स्थानकाला बुधवारी ९१ वष्रे पूर्ण झाली. त्यानिमित्त या ऐतिहासिक वास्तूच्या आवारात प्रवाशांतर्फे दादभोय यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. रेल्वे प्रवासी ग्रुपकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात दादभोय यांनी प्रवाशांशी तसेच ग्रुपच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, इमारतीच्या देखभाल आणि सुधारणांबाबत अनेकांची मते जाणून घेतली आहेत. त्यांनी केलेल्या मागण्यांचा देखील विचार सुरू आहे. येत्या काळात ही इमारत चांगल्या प्रकारे जतन करण्यात येणार असून वास्तूला नवे रूप देण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत, तसेच वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व कायम राहील याची काळजी घेण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांतील नसíगक आपत्ती आणि दीड वर्षांपूर्वी लागलेली भीषण आग या घटना पचवीत रेल्वे स्टेशनची इमारत दिमाखात उभी आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमात अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक मििलद देऊस्कर, वरिष्ठ परिचालक प्रबंधक अशोककुमार तिवारी, वरिष्ठ स्टेशन प्रबंधक ए. के. पाठक, जेआरपीएफचे मुख्य पोलीस निरीक्षक श्रीसागर, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा, सचिव मिलिंद शेडगे, केडगाव रेल्वे प्रवासी ग्रुपचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्याध्यक्ष दिलीप कोळकर आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

राजस्थानमधील वास्तुतज्ज्ञांची मदत?

देशात अनेक अशी मोठी व पुरातन मंदिरे आहेत, त्यांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात येत आहे. त्याच पद्धतीने या वास्तूची निगा राखण्यात यावी. त्यासाठी राजस्थानमधील वास्तुतज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण तेथील अनेक कारागीर अशा वास्तूंची देखभाल घेण्याच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व कायम राहील आणि आवश्यक ते बदलही करता येतील, अशी अपेक्षा हर्षां शहा यांनी दादभोय यांच्याकडे कार्यक्रमात व्यक्त केली.