News Flash

पुण्याच्या तोंडाला पाने!

मध्य रेल्वेमध्ये असलेल्या पुणे विभागाकडून रेल्वेला वर्षांला तब्बल बाराशे कोटीहून अधिक उत्पन्न मिळते.

प्रतिनिधिक छायाचित्र

रेल्वेबाबतच्या मागण्यांसाठी प्रतीक्षा;  नवे व प्रलंबित प्रकल्प गुलदस्त्यातच

केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे यंदा मुख्य अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश करून अर्थमंत्र्यांनी रेल्वेबाबत व्यापक स्तरावर योजना जाहीर केल्या असल्या, तरी त्यातून ठराविक विभागांना काय मिळणार हे स्पष्ट नसल्याने रेल्वेकडून पुणेकरांच्या विविध मागण्यांची प्रतीक्षा कायम राहिली आहे. जाहीर निधीमधून आपल्याला काय मिळते, याची आता वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत तरी पुणेकर प्रवाशांना आवश्यक असणाऱ्या सुविधा, नव्या आणि प्रलंबित प्रकल्पांची कामे गुलदस्त्यातच राहिली आहेत.

मध्य रेल्वेमध्ये असलेल्या पुणे विभागाकडून रेल्वेला वर्षांला तब्बल बाराशे कोटीहून अधिक उत्पन्न मिळते. उत्पन्नाच्या तुलनेत प्रवाशांना उपयुक्त सुविधा व प्रकल्पांवर खर्च अपेक्षित असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पुणे, िपपरी-चिंचवड शहर आणि परिसर, पुणे ते दौंड, पुणे ते बारामती आदी पट्टय़ामध्ये मागील काही दिवसांमध्ये लोकवस्ती झपाटय़ाने वाढली आहे.

परिणामी रेल्वेच्या सर्वच सुविधांवर ताण निर्माण झाला आहे. स्थानकांतील सुविधांबरोबरच शहरांच्या विकासाबरोबरच उपनगरीय वाहतुकीचा विस्तार होणे गरजेचे झाले आहे. या सर्वासाठी पुढील काळात प्रत्यक्षात किती निधी उपलब्ध होतो, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

पुण्याला पर्यायी स्थानक कधी?

वाढत्या लोकसंख्येमुळे पुणे रेल्वेस्थानकावरील ताण दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वेने हडपसर येथे पर्यायी टर्मिनल उभारणीची घोषणा केली. मात्र, त्यानंतर पुढे काहीही झाले नाही. हे स्थानक प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने कोणताही भरीव निधी दिलेला नाही. स्थानकासाठी चाळीस एकरहून अधिक जागेची गरज भासणार आहे. ही जमीन कशी मिळवणार याचीही स्पष्टता झालेली नाही.

पुणेनाशिकसाठी नवा मार्ग

पुणे- नाशिकसाठी नव्या रेल्वेमार्गाची घोषणा होऊन प्वीस वर्षांचा कालावधी लोटला. या वीस वर्षांक केवळ सर्वेक्षणाशिवाय कोणतेही काम झालेली नाही. अर्थसंकल्पाक दरवर्षी या मार्गाचा उलेलेख केला जातो, मात्र पुढे काहीही होत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

पुणेलोणावळा मार्ग विस्ताराचे काय?

पुणे ते लोणावळा मार्गाच्या तीनपदरीकरणाचे गुऱ्हाळ अनेक दिवस कायम आहे. दोन वेळा सर्वेक्षणाचे कामही झाले आहे. या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निधीची आवश्यकता आहे. मात्र, पुणे-िपपरी-चिंचवडसह सर्वच स्थानिक स्वराज संस्थांनी रेल्वेच्या या प्रकल्पाला निधी देण्यास नकार दिला आहे. त्याबाबत रेल्वेने भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्याचप्रमाणे रेल्वेनेही या प्रकल्पासाठी भरीव निधी जाहीर केलेला नाही.

 पुणेमुंबई सेवेचा विस्तार कधी?

पुणे ते मुंबई दरम्यान वाढीव गाडय़ा सोडण्याची प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी आहे. त्यासाठी मार्गाचा विस्तार व स्वयंचलित सिग्नल यंत्रणेची आवश्यकता आहे. मात्र ही यंत्रणा उभारण्यासाठी मोठा निधी लागणार असल्याने काम ठप्प आहे.

पुणे विभाग बाराशे कोटी रुपयांचे उत्पन्न देत असेल, तर त्या प्रमाणात यंत्रणा उभारणी गरजेची आहे. पुणे-लोणावळा-मुंबई दरम्यान लोकल सुरू होणे अपेक्षित आहे. रेल्वेने पुणे झोन वेगळा केला, तर विकास साध्य होईल. पुणे स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जा जाहीर केला, पण आजवर पैसे दिले नाहीत. त्यामुळे कोणतीही योजना पुढे गेलेली नाही. अर्थमंत्र्यांनी केवळ रेल्वे सुरक्षेचा उल्लेख केला, पण अपघात कधी थांबणार याचे स्पष्टीकरण दिले नाही.

हर्षां शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 3:34 am

Web Title: railway budget to pune
Next Stories
1 तपासधागा : विवाहाच्या आमिषाने फसवणूक
2 ब्रॅण्ड पुणे : इलेक्ट्रिक दुचाकींमधील ‘मिरॅकल’!
3 पुण्यात अल्पवयीन गतीमंद मुलीचे लैंगिक शोषण
Just Now!
X