पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारपासून (२८ जुलै) तीन दिवसांचा पुणे दौरा करणार आहेत. पक्षाचे शाखा अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या नेमणुका या दौऱ्यात होणार आहेत.

महापालिके ची आगामी निवडणूक पुढील वर्षी फे ब्रुवारी महिन्यात अपेक्षित आहे. त्या दृष्टीने गेल्या आठवडय़ातही राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा के ली होती. या दौऱ्यात त्यांनी शाखा अध्यक्षांची नव्याने नेमणुका करण्याचे आदेश शहराध्यक्ष वसंत मोरे आणि पक्षाचे नेते बाबू वागसकर यांना दिले होते. त्यानुसार राज ठाकरे यांच्या उपस्थितीतच या नेमणुका करण्यात येणार आहेत.  बुधवारी कसबा, पर्वती आणि हडपसर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येतील. गुरुवारी (२९ जुलै) शिवाजीनगर, कोथरूड आणि पुणे

कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील तर शुक्रवारी (३० जुलै) खडकवासला आणि वडगांवशेरी विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होतील, असे वसंत मोरे आणि बाबू वागसकर यांनी सांगितले.