News Flash

राजेश देशमुख पुण्याचे नवे जिल्हाधिकारी

माजी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पीएमओत नियुक्ती

राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या जागी अनेक अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा होती. अखेर डॉ. राजेश देशमुख यांची पुणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. राजेश देशमुख हे सन २००८ सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यानंतर आता पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची ते जागा घेतील. राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांची जाग रिक्त झाली होती.

राम यांची पीएमओत नियुक्ती झाल्याने पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. दरम्यान, आज (सोमवार) राज्य सरकारने पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 2:54 pm

Web Title: rajesh deshmukh is the new district collector of pune aau 85 svk 88
Next Stories
1 पुणे, साताऱ्यात रेड अलर्ट! हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा
2 वय वर्ष ७९, राज्यपाल कोश्यारींनी पायी चालत सर केला शिवनेरी किल्ला
3 पार्थ पवारांना आम्ही भाजपात घेणारही नाही : गिरीश बापट
Just Now!
X