06 March 2021

News Flash

पुण्यात रशियन लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु; १७ जणांना दिला डोस

पुण्यातील नोबेल रुग्णालयात चाचणी सुरु

भारतात रशियाच्या स्पुटनिक-५ या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु झाली आहे. पुण्यातील नोबेल रुग्णालयात ही चाचणी करण्यात येत असून १७ स्वयंसेवकांना या लसीचा डोस देण्यात आला आहे. दरम्यान, या सर्वांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

नोबेल रुग्णालयाच्या प्रशासनानं सांगितलं की, “लसीच्या क्लिनिकल चाचणीमध्ये ट्रायल प्रोटोकॉलचं पूर्णपणे पालन केलं जात आहे. ज्या लोकांना ही लस देण्यात आली आहे, त्यांचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.”

गॅमेलेया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) हे संयुक्तरित्या स्पुटनिक-५ ही लस तयार करत आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, भारताने रशियाकडून या लसीचे १०० मिलियन (१० कोटी) डोस खरेदी केले आहेत.

“मानवी चाचणीदरम्यान १७ तंदुरुस्त स्वयंसेवकांना गेल्या तीन दिवसांत स्पुटनिक-५ या लसीचे डोस देण्यात आले आहेत. ही रोगप्रतिबंधक लस टोचण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरु झाली आहे. सर्व स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली आहे. या सर्वांना पुढील काही दिवस निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. प्रोटोकॉलनुसार, चाचणीसाठी स्वयंसेवकांनी निरोगी असलं पाहिजे. याचे पालन करत या १७ स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे,” अशी माहिती नोबेल रुग्णालयाच्या क्लिनिकल रिसर्च विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. राऊत यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 8:35 pm

Web Title: second phase of russian vaccine trial begins in pune vaccinated 17 people aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चीनची खुमखुमी कायम; अरुणाचलजवळ वसवली तीन गावं
2 लस करोनाचं संक्रमण थांबवेलच, याची खात्री नाही; ‘फायझर’च्या विधानानं गोंधळ
3 आमचं न ऐकल्यानेच पेच निर्माण झाला; शरद पवारांनी मोदी सरकारला सुनावले खडेबोल
Just Now!
X