News Flash

दोन परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांचे नुकसान

ज्यसेवा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना रेल्वेने परीक्षेची तारीख बदलून द्यावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे

रेल्वेने परीक्षेची तारीख बदलून देण्याची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा आणि रेल्वे भरतीची परीक्षा एकाच दिवशी येत असून त्यामुळे या दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची अडचण झाली आहे. रेल्वेने परीक्षेची तारीख बदलून द्यावी अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

या वर्षीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा येत्या १० एप्रिलला होत आहे. अ आणि ब गटातील १०९ पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. याच दिवशी रेल्वे भरतीचीही परीक्षा घेण्यात येणार आहे. ब आणि क गटांतील पदांसाठी ही परीक्षा होत आहे. जास्त पदसंख्या असल्याने दोन्ही परीक्षा देणारे उमेदवार मोठय़ा प्रमाणावर आहेत.  रेल्वेकडून घेण्यात येणारी परीक्षा ही ऑनलाइन होणार असून ती एकापेक्षा अधिक दिवस चालणार आहे. त्यामुळे राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना रेल्वेने परीक्षेची तारीख बदलून द्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 3:41 am

Web Title: staff selection commission exam and railway exam clashes on same date
Next Stories
1 ‘लोकसत्ता’मुळेच आर्थिक, सामाजिक आकलन
2 पीएच.डी.चा कालावधी हा अनुभव म्हणून ग्राह्य़ 
3 शिक्षक परिषदेतर्फे साखळी उपोषण सुरू
Just Now!
X