दुनिया घुम लो शेवटी लस पुण्यातच सापडणार आहे असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. आम्हाला दिल्लीची सवय आहे. इथे मी ऐकलं १५०० कोटी, १६०० कोटींची विकासकामं होत आहेत. दिल्लीत तर एक लाख कोटींच्या पुढेच सगळ्या गप्पा असतात. आम्ही त्या गप्पा ऐकतो.. हे कोण बोलतं ते तुम्हाला माहित आहे. ते आज पुण्यात आलेत. दुनिया घुम लो पुण्याच्या पुढे काही नाही. जगभर फिरलात तरीही लस शेवटी पुण्यातच सापडणार आहे. ती लस पुणेकरांनी शोधली आहे. अन्यथा म्हणायचे मीच शोधली असं म्हणत सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
एक लक्षात ठेवा पुण्यातच करोनावरची लस तयार झाली आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. कुणी बाहेरुन क्लेम केला तर गैरसमज करु नये असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्युटचा दौरा केला. या दौऱ्यावर सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. आता आज मी इथे सुनीलभाऊंच्या घरी आले आहे. पण इथला स्वयंपाक मी केलेला नाही. तसंच लस ही पुणेकरांनी आणली आहे हे लक्षात असू द्या.. इतर कुणी क्लेम केल्यास तुम्हाला सांगता येईल असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 28, 2020 5:18 pm