News Flash

यंदा ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार प्रस्थान!

१३ ते ३० जून पर्यंत पादुका देऊळ वाड्यात असणार ; प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली माहिती

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी (पादुका) प्रस्थान सोहळा दोन दिवसांवर येऊन येऊन ठेपला आहे. परंतु, संबंधित मंदिर परिसर हा कंटेंमेंट झोन म्हणून घोषित केला गेलेला आहे. अशावेळी मुख्य मंदिरातील परंपरागत पूजा आणि प्रदक्षिणा घालण्यात येणार असुन, त्यानंतर पादुका आजोळ घराच्या देऊळ वाड्यामध्ये ठेवण्यात येणार आहेत. ही सर्व विधिवत आणि पारंपरिक पूजा मोजक्या प्रतिनिधींच्या उपस्थित होणार आहे. अशी माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

१३ ते ३० जून पर्यंत पादुका देऊळ वाड्यात राहणार आहेत. मात्र यावेळी नागरिकांना पादुकांचे दर्शन घेण्यास परवानगी नसणार आहे. प्रशासनाने दिलेल्या पर्यायनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी पादुका पंढरपूरला रवाना होतील. मात्र, अद्याप पर्यायांबात प्रशासनाचा कोणताच निर्णय आलेला नाही, असे प्रांताधिकारी तेली म्हणाले आहेत.

आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा संबंधी देवस्थान विश्वस्थांच्या सोबत बैठक पार पडली आहे. यामध्ये १३ जूनचे प्रस्थान परंपरागत करायचे ठरले असले, तरी प्रशासनाने परवानगी दिलेले प्रतिनिधीच पादुका प्रस्थानाला उपस्थित राहतील, असे सांगण्यात आले आहे.  तर, आळंदीमध्ये मंदिर लगतच्या  परिसरात एका करोनाबाधित महिलेचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मंदिर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला असुन, मंदिर परिसरात प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. याचा प्रस्थान सोहळ्यावर परिणाम होणार आहे.

अगदी मोजक्या प्रतिनिधींचा उपस्थित  हा सोहळा होणार आहे.  पादुकांची आरती होऊन पादुका आजोळ घराच्या देऊळ वाड्यात ठेवण्यात येतील. १३ ते ३० जून या कालावधीत पादुका  तिथेच राहतील. लॉकडाउनमध्ये धार्मिकस्थळ उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळं आळंदीचे मंदिर पूर्णतः बंद राहणार आहे. आळंदीमध्ये नियमांचे उलंघन करून आल्यास ज्या प्रकारे पंढरपूरमध्ये कारवाई करण्यात आली, तशी आळंदीमध्ये कारवाई करण्यात येईल असंही तेली यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 2:16 pm

Web Title: this year dnyaneshwar maulis palkhi ceremony will depart in the presence of few representatives msr 87 kjp 91
Next Stories
1 धक्कादायक! पुण्यात आढळलेल्या ‘त्या’ बनावट नोटांची किंमत तब्बल ८७ कोटी
2 आळंदीमध्ये करोनाबाधित महिलेच्या मृत्यूने खळबळ; मंदिर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित
3 करोनामुळे नेत्रदानाची टाळेबंदी
Just Now!
X