दोन उच्च शिक्षित तरुणांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत येथे लहान मुलीपासून वयोवृद्ध महिलांपर्यंत चहा मोफत ठेवला आहे. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल ४०० पेक्षा जास्त महिलांनी याचा आस्वाद घेतला आहे.हा उपक्रम रत्ना अमृतुल्य ने ठेवला असून त्याचे मालक संकेत चौगुले आणि अक्षय राऊत आहेत. दोघे ही उच्च शिक्षित असून समाजच देणं लागतो या भावनेतून महिलांसाठी उपक्रम राबवण्याचे ते सांगतात.

रावेत येथे अक्षय आणि संकेत यांनी चहाचे दुकान थाटले असून दोघे ही उच्च शिक्षित आहेत.समाजाचे देणे लागतो या भावनेतून त्यांनी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी खास मोफत चहा ठेवला होता.यात कामगार महिला,महाविद्यालयीन तरुणी,गृहिणी आणि संगणक अभियंता तरुणींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे.सकाळ पासून दुपारपर्यंत तब्बल ४०० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला आहे.प्रत्येक महिला आणि मुलींपर्यंत चहा मोफत देणार असल्याचे फ्लेक्स द्वारे कळवले होते.तसे शहरातील अनेक भागात चहा मोफत देणार असल्याचे त्यांनी फ्लेक्स लावले होते.

विशेष म्हणजे चहाचे सहा प्रकार ठेवले असून यात साधा चहा, मसाला चहा,लेमन टी, ग्रीन टी आणि लहान मुलींनीसाठी हॉट चॉकलेट चहा ठेवला होता.याचा आस्वाद अनेक महिलांनी घेतला आहे.या उपक्रमाने महिला वर्ग भारावून गेला आहे.एरवी एक रुपया न सोडणारे चहा वाले आज चक्क मोफत चहा दिल्याचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.रत्ना अमृतुल्य हे दहा वाजे पर्यंत सुरू राहणार असल्याचे संकेत आणि अक्षय यांनी सांगितले असून मोफत चहा चा अधिक महिलांनी आनंद घ्यावा अस आवाहन करण्यात आलं आहे.