म्हाडा इमारतीचे काम सुरू असताना १९ व्या मजल्यावरून खाली पडल्याने कामगाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घडली आहे. राजकुमार अशोक घोसले (२४) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर इतर दोघे जण जखमी असून बाबुराव यादव आणि करण यादव, अशी त्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मयत राजकुमार आणि इतर दोन कामगार हे क्रेनवर उभे राहून इमारतीच्या १९ व्या मजल्यावर प्लाष्टरचे काम करत होते. तेव्हा, क्रेनचे ब्रेक निकामी झाल्याने ते खाली पडले. यात राजकुमार याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीमध्ये म्हाडाच्या इमारतीचे काम सुरू आहे. मयत राजकुमार आणि दोन कामगार हे क्रेन वर उभे राहून सेफ्टी बेल्ट वापरून १८ आणि १९ व्या मजल्यावर प्लाष्टरचे काम करत होते. तेव्हा अचानक उभा असलेल्या क्रेनचे ब्रेक निकामी झाले आणि कामगार थेट खाली पडले. यात राजकुमार हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

तर बाबुराव यादव आणि करण यादव हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कामगारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सेफ्टी बेल्ट असताना कामगार खाली पडलेच कसे असा प्रश्न निर्माण होत असून घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राजकुमार हा मूळचा छत्तीसगड येथील आहे. तो पिंपरी-चिंचवडमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी आला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Workers fell from 19th floor building one dead two injured jud
First published on: 11-07-2019 at 15:52 IST