24 February 2021

News Flash

रेल्वे इंजिनच्या समोर उडी मारून तरुणाची आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही

प्रातिनिधिक छायाचित्र.

पिंपरी चिंचवड मधील कासारवाडी रेल्वे स्थानका जवळ एका २५ वर्षीय तरुणाने रेल्वे इंजिन समोर उडी मारून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना साडे तीनच्या सुमारास घडली आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, लोणावळ्यावरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या पिवळ्या रेल्वे इंजिनच्या समोर २५ वर्षीय तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. हा तरुण रेल्वे इंजिन तारा दुरुस्तीचे, तसेच रेल्वे रुळाचे काम करत असे. तरुणाच्या डोक्याला रेल्वे इंजिनच्या अपघातात गंभीर जखम झाली होती त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अद्याप तरुणाची ओळख पटली नसून निळी रंगाची जीन्स, चौकडा शर्ट, पांढरी बनियान, रंग सावळा. असे या २५ वर्षीय तरुणाचं वर्णन आहे. पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 10:13 pm

Web Title: young man commits suicide in front of train
Next Stories
1 लोणवळ्यामध्ये दुहेरी हत्याकांड, विद्यार्थ्यांमध्ये उसळली संतापाची लाट
2 भाजपच्या संघर्ष यात्रेचा मीही साक्षीदार, त्याबद्दल न बोललेलंच बरं: धनंजय मुंडे
3 ‘आईस्क्रीम’मुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ‘गोठली’!
Just Now!
X