पिंपरी : टास्कच्या एका ‘रिव्हयुज’ला १५० रुपये देण्याचे आमिष दाखवून संगणक अभियंत्याची तब्बल १२ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २७ ते २९ मार्च २०२३ दरम्यान वाकड येथे घडला.

याप्रकरणी संजय दशरथ अमृतकर (वय ५१, रा. स्कायलाईन सोसायटी वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जेम्स, पूजन आणि प्रिशा नावाची एका महिला अशा तिघांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – क्रुरतेच्या आधारावर पत्नीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा एका दिवसात निकाली

फिर्यादी अमृतकर हे बंगळुरू येथे संगणक अभियंता आहेत. फिर्यादी यांच्या मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला. त्यामध्ये गुगल लोकेशन रिव्हयुजमध्ये तुम्हाला दिवसातून एक ते दोन तास द्यायचे, त्या मोबदल्यात एका रिव्हयुजचे १५० रुपये देण्याचे आमिष दाखविले. टास्कचे पैसे घेण्यासाठी ‘रिसेप्शनिस्ट हॅना’ या टेलिग्राम अकाउंटवर जॉइन होण्यास सांगितले. दिवसाला २४ टास्क खेळायचे असतात. पैसे भरायचे टास्क हे आपण पैसे गुंतवणूक केल्यानंतर भरलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम परत केली जाते असे फिर्यादीला आश्वासन दिले.

हेही वाचा – महापारेषण कंपनीचे हिंजवडी उपकेंद्र सात वर्षांपासून धूळ खात पडून; दोषींवर कारवाईची सजग नागरिक मंचची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२८ मार्च रोजी २१ नंबर टास्क खेळण्यास भाग पाडून आरोपींनी फिर्यादीला १५ हजार रुपयांची पहिली ऑर्डर पेटीएमवर भरण्यास लावले. दुसरी रक्कम एक लाख २० हजार रुपये भरायला लावले. त्यानंतर २९ मार्च रोजी टास्क पुढे तसाच चालू ठेवून तिसरी ऑर्डर तीन लाख ५० हजार रुपये आणि चौथी ऑर्डर आठ लाख भरायला लावले. फिर्यादीला वेगवेगळ्या अकाउंटवर एकूण १२ लाख ८५ हजार रुपये भरायला प्रवृत्त केले. भरलेली रक्कम रिफंड न करता, कोणताही मोबादला न देता त्यांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.