कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांनी केलेली मद्य पार्टीचे प्रकरण ताजे असतानाच येरवडा भागात एका १६ वर्षीय मुलीने मैत्रिणीसोबत घरी पार्टी केली. पार्टीनंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्याऱ्या मुलीसोबत असलेली मैत्रिण बेशुद्धावस्थेत सापडली. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणाचा येरवडा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. तनिषा शांताराम मनोरे (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मद्य पार्टीत आणखी एक १६ वर्षीय मुलगी अतिमद्यसेवनामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> समाजमाध्यमातील समूहात आक्षेपार्ह संदेश प्रसारित करून पुण्यातील संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

तनिषा ही येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात राहायला आहे. ती एका महाविद्यालयात अकरावीत होती. तिची आई भाजी विक्रीचा व्यावसाय करते. सोमवारी (१५ जुलै )सायंकाळी दोन मैत्रिणींनी तनीषाच्या घरी मद्य पार्टी केली. तनिषाच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाला तनिषाच्या मैत्रिणीने दूरध्वनी करून रात्री आठच्या सुमारास बोलवून घेतले. त्यानंतर मुलगा घरी आला. त्याने घरात डोकावून पाहिले. तेव्हा तनिषाने गळफास घेतला असल्याचे उघडकीस आले. त्याने तनिषाला खाली उतरवले. चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याने तनिषाच्या आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तनिषाला रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता.

हेही वाचा >>> Pooja Khedkar : “अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणं शक्य नाही”, पूजा खेडकर यांची मागणी रुग्णालयाने फेटाळली होती!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 तनिषाची मैत्रिण देखील बेशुद्धावस्थेत सापडली. तिला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा ती मद्याच्या नशेत असल्याचे लक्षात आले. तिच्या आई-वडिलांनी तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता तनिषा आणि मैत्रिणींनी मद्य पार्टी केल्याचे उघडकीस आले. दारू पार्टीनंतर त्यांनी उलट्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तनीषाने आत्महत्या का केली, तसेच तिने कधी गळफास घेतला, याबाबतची माहिती समजू शकली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.