सोसायटय़ांसाठी खासगी सुरक्षा पुरविण्याचा बनावट पोलीस परवाना तयार करून विमाननगर भागातील सोसायटय़ांना सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.
प्रच्युत राधा मोहनसिंग (वय २६, रा. मंगल प्लाझा सोसायटी, विमाननगर) आणि विवेकचंद्र देवराम भारती (वय २५, रा. साई रिजन्सी, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हरिभाऊ भगवान मार्कड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर भागातील सोसायटय़ांना खासगी सुरक्षा पुरविण्याचा बनावट परवाना आरोपींनी तयार केला. त्यावरून विमाननगर येथील कोनार्कनगर सोसायटी, कोनार्क कॅम्प या सोसायटय़ांना गेल्या वर्षभरात ३४ सुरक्षारक्षक पुरविले. त्या सोसायटय़ांकडून पैसे घेऊन सोसायटी आणि राज्य शासनाची फसवणूक केली.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2013 रोजी प्रकाशित
बनावट पोलीस परवान्याव्दारे सोसायटय़ांना पुरविली सुरक्षा – दोघांना अटक
सोसायटय़ांसाठी खासगी सुरक्षा पुरविण्याचा बनावट पोलीस परवाना तयार करून विमाननगर भागातील सोसायटय़ांना सुरक्षारक्षक पुरवणाऱ्या दोघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.
First published on: 16-05-2013 at 01:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 arrested for using fake police license to provide security service for societies