पुण्यातील वारजे माळवाडीमध्ये एका पार्टीदरम्यान २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अभियांत्रिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या सात ते आठ मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या पार्टीनंतर बलात्काराची ही घटना घडली असून आपल्याच ग्रुपमधील एका मुलीवर बलात्कार करणाऱ्या २४ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मित्र-मैत्रिणींनी एकत्र येऊन घरच्या घरी आयोजित केलेल्या पार्टीदरम्यान २४ वर्षीय स्वप्निल ठाणगे या आरोपींने आपल्या २० वर्षीय मैत्रिणीवर बलात्कार केल्याची घटनेमुळे वारजे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मूळचा दौंड येथील राहिवाशी असलेल्या स्वप्निलला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर येथे राहणार्‍या एका मित्राच्या घरी सात ते आठ जणांनी पार्टीच आयोजन केले. शनिवारी या पार्टीचं आयोजन करण्यात आलं त्यावेळी २० वर्षीय पीडित तरुणीने मद्यपान केल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. मोकळ्या हवेत उभं रहावं असा विचार करुन ही तरुणी घराच्या गॅलरीमध्ये गेली. या तरुणीपाठोपाठ आरोपी स्वप्निल देखील गॅलरीमध्ये गेला. त्याने देखील मद्यपान केलं होतं. नशेच्या धुंदीत असलेल्या स्वप्निलने गॅलरीमध्ये पहाटेच्या सुमारास या तरुणीवर बलात्कार केला.

या घटनेबाबत पीडित तरुणींने मैत्रिणीला सर्व घटनाक्र सांगितला. पीडित तरुणीने मैत्रिणीच्या मदतीने पोलीस स्थानकामध्ये धाव घेतली. या तरुणीने आमच्याकडे तक्रार देताच आम्ही आरोपी स्वप्निल ठाणगे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये अधिक तपास करण्यात येत असल्याचे वारजे माळवाडी पोलिसांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.