शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ३७ गुंतवणूकदारांना चार कोटी दहा लाख ८३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी माधव कुमारील भागवत (वय ५८, रा. शारदा हेरिटेज, सावित्रीनगर, हिंगणे खुर्द) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुंतवणुकदार नितीन वसंत अनासपुरे (वय ५१, रा. सदाशिव पेठ) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माधव भागवत यांनी सिंहगड रस्त्यावर कार्यालय सुरु केले होते. शेअर बाजारात पैसे गुंतविल्यास त्यावर दरमहा पाच टक्के परतावा मिळेल तसेच शेअर बाजारात गुंतविलेल्या रक्कमेवर मिळणाऱ्या नफ्यामध्ये ६० टक्के गुंतवणुकदाराना भागीदारी देण्याचे आमिष दाखविले होते. भागवत यांच्या शैलजा कमर्शिअल योजनेत १३५ दिवसांसाठी गुंतवणुक केल्यास त्यावर दुप्पट रक्कम मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले होते.

byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद

आमिषाला बळी पडून नितीन अनासपुरे यांनी त्यांची आई, सासरे यांच्या नावाने दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यांच्यासह आणखी ३७ गुंतवणूकदारांनी चार कोटी दहा लाख ८३ हजार ७२५ रुपयांची गुंतवणूक केली होती. गुंतवणूकदारांना परतावा देण्यात न आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर पोलिसांनी भागवत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक वैरागकर तपास करीत आहेत.