scorecardresearch

देशातील दहा ‘सक्रिय’ खासदारांमध्ये राज्यातील चौघांना स्थान; सुप्रिया सुळे पहिल्या, श्रीरंग बारणे दुसऱ्या स्थानावर

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रापर्यंतच्या देशातील खासदारांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले आहे.

mp from maharashtra
सुप्रिया सुळे , श्रीरंग बारणे

पिंपरी : लोकसभेच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे ‘गेट वे पॉलिटिकल स्टॅटेजिक’ संस्थेमार्फत सतराव्या लोकसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रापर्यंतच्या देशातील खासदारांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार संसदेतील कामकाजात सक्रिय सहभागी होणाऱ्या पहिल्या दहा खासदारांमध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे. बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पहिल्या, तर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा दुसरा क्रमांक आहे.

खासदारांच्या कामाची माहिती लोकसभेच्या संकेतस्थळावर दिलेली असते. त्या माहितीच्या आधारे सतराव्या लोकसभेतील खासदारांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या दहा खासदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपचे तीन, शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा एक आणि डीएमकेचे दोन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत.

खासदार श्रीरंग बारणे यांनी सतराव्या लोकसभेत ५०८ प्रश्न विचारले आहेत. १४८ वेळा चर्चेत सहभाग घेतला. सभागृहातील उपस्थिती ९४ टक्के असून, दहा टक्के खासगी विधेयके मांडली आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अग्रभागी आहेत. शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आठव्या आणि राहुल शेवाळे नवव्यास्थानी आहेत.

मावळच्या जनतेने माझ्यावर सलग दोन वेळा विश्वास टाकला. देशाच्या संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरेल, असे काम करत आहे.श्रीरंग बारणे, खासदार, मावळ

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 01:21 IST

संबंधित बातम्या