पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १६२१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. १ लाख ३८ हजार ९५१ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात ४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार २९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १२५६ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख १७ हजार ८८२ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ८५६ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ४९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर १ हजार ३१८ जण आज करोनातून मुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ७४ हजार ११६ वर पोहचली असून पैकी, ६० हजार ७६४ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ८९२ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 41 deaths in pune due to corona and 49 deaths in pimpri scj 81 svk 88 kjp
First published on: 25-09-2020 at 19:54 IST