पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात ७२ धोकादायक इमारती व घरे असून, त्यामध्ये तीन इमारती अतिधोकादायक आहेत. धोकादायक इमारतींची सर्वाधिक ३४ संख्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत आहे. धाेकादायक इमारत मालकांना नाेटीस बजावण्यात आली आहे.

शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जाेरदार पाऊस काेसळत आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने शहरातील धोकादायक बांधकामे स्वतःहून काढून घ्यावीत किंवा ती तातडीने दुरुस्त करून घ्यावीत, असे आवाहन नागरिकांना केले आहे. अशा धोकादायक इमारतींना नोटीस बजावली आहे. अशा इमारतींची संख्या ७२ आहे. त्यातील तीन इमारती या अतिधोकादायक आहेत. नोटीस दिल्यानंतर आठ जणांनी इमारतीची दुरुस्ती केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शहरातील धोकादायक इमारतींचा शोध घेऊन त्यांना महापालिकेने नोटीस दिली आहे. नोटिशीला प्रतिसाद देत काही नागरिकांनी स्वतःहून दुरुस्ती करून घेतली आहे.’ असे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.