पुण्यातील सारसबागेजवळील कॅनॉलमध्ये जन्मदात्यानेच १३ वर्षीय मुलींला ढकलून देऊन मारल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. संदीप विष्णु शिंदे (वय ४० रा.दत्तवाडी) आरोपी वडिलांचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी वडिलांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा– पुणे : पत्नीच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; पत्नीसह तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा

स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक अशोक इदलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडील संदीप विष्णु शिंदे हा रिक्षा चालक आहे. तो दत्तवाडी येथे राहण्यास असून त्याची आणि पत्नीची भांडण सतत होत होती. आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास संदीप आपल्या मुलीला घेऊन सारसबागेजवळील कॅनॉलच्या ठिकाणी आला. त्यानंतर त्याने मुलीला कॅनॉलमध्ये ढकलून दिले.

हेही वाचा- पुणे : पती शरीरसंबंध ठेवण्यास अपात्र; उच्चशिक्षित विवाहितेची पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलगी पाण्यात पाडल्यानंतर वाचवण्यासाठी आरडाओरडही केली. मात्र, तोपर्यंत मुलीचा जीव गेला होता. कॅनलची खोली अधिक असल्यामुळे अद्याप मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात अडचण येत आहे. घटनेनंतर आरोपी संदीप विष्णु शिंदे याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्यानंतर आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.