पुण्यात मास्क न घालता बाहेर फिरणाऱ्या नागरिकाला १ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुणे कॅम्प भागात हा नागरिक फिरत होता. या पुणेकराविरोधात ११ एप्रिलला FIR दाखल करण्यात आला होता. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता गाडीवरुन फिरत होता. त्या प्रकरणी त्याला दंड ठोठावण्यात आला आहे.

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या ही देशात सर्वाधिक आहे. तसंच मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे ही दोन्ही शहरं रेड झोनमध्ये आहेत. अशात मास्क घातला नाही तर कारवाई होईल असं पुणे आणि मुंबई महापालिकेने आधीच सांगितलं आहे. त्यामुळे त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली आहे.