वकील तरुणीचा विनयभंग तसेच तिला धक्काबुक्की केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यासह चौघांच्या विरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका वकील तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, इरकल, त्यांची पत्नी संध्या यांच्यासह चौघांच्या विरुद्ध विनयभंग, धक्काबुक्की, शिवीगाळ करुन धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- चिंचवड पोटनिवडणूक: आईसाठी लेक प्रचाराच्या मैदानात; दिवंगत लक्ष्मण जगतापांची लेक ऐश्वर्या करत आहे आईचा प्रचार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इरकल हे शिवाजीनगर भागातील वडारवाडी परिसरात राहायला आहेत. सोमवारी (१३ फेब्रुवारी) रात्री पावणेनऊच्या सुमारास वकील तरुणी दुचाकीवरुन पूना हाॅस्पिटलकडे निघाली हाेती. त्या वेळी इरकल, त्यांची पत्नी; तसेच एक महिला आणि पुरुष असे चौघे जण माेटारीतून निघाले होते. पत्रकार नगर येथे तरुणीने हाॅर्न वाजविल्याने इरकल आणि मोटारीतील तिघे जण चिडले. त्यांनी मोटार बाजूला थांबवून वाद घालण्यास सुरुवात केली. इरकल यांनी अश्लील वर्तन करुन विनयभंग केला. इरकल यांची पत्नी संध्याने चपलेेने मारहाण केली तसेच मोटारीतील एक महिला आणि एका व्यक्तीने धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली, असे तक्रारदार तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर तपास करत आहेत.