पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना दरम्यान देशीविरोधी घोषणा दिल्याची घटना घडली. त्या घोषणाबाजीच्या निषेधार्थ आज पुण्यातील अलका टॉकीज मनसेचे नेते अजय शिंदे आणि युवा सेनेकडून जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आंदोलन करण्यात आले. या दोन्ही आंदोलनाच्या ठिकाणी नेतृत्वाखाली पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.तर पाकिस्तानचा झेंडा देखील जाळण्यात आला.या सर्व घडामोडी दरम्यान भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधीनी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन, पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई अशी मागणी केली.
यावेळी भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की,पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना ज्यांनी घोषणा दिल्या.त्या सर्वांना अटक करून देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा.तसेच यापुढे कोणाचाही हिम्मत अशा प्रकारची होता कामा नये.अशा स्वरूपाची आम्ही पोलिस आयुक्तांकडे केल्याच त्यांनी सांगितले.

संबधित व्हिडिओ लॅबमध्ये तपासणी करीता पाठवला
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना दरम्यान देशीविरोधी घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.मात्र तो व्हिडिओ आम्ही लॅबमध्ये तपासणी करीता पाठवला आहे. आता त्याचा अहवाल आल्यानंतर आंदोलनकर्त्यांवर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याच पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिस आयुक्त कार्यालय परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलना दरम्यान देशीविरोधी घोषणा करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी.या मागणीचे निवेदन देण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे अडीच वाजता येणार होते. मात्र त्यापूर्वीच कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिस कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.आता यांच्यावर देखील गुन्हे दाखल करणार का यावर पोलिसांनी उत्तर देण टाळल.