लष्कर भागातील एका हॅाटेलच्या गल्ल्यातून कामगाराने एक लाखांची रोकड तसेच मोबाइल संच असा एक लाख ११ हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना उघडकीस आली.

हेही वाचा – पुणे : पत्नीला अश्लील संदेश पाठविणाऱ्या मेहुण्याचा खून ; दाम्पत्यासह चौघे अटकेत

याबाबत हॉटेल मालक अदिक ठोकळे (वय ३०) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ठोकळे यांचे लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर हॅाटेल आहे. हॅाटेलमधील कामगाराने ठोकळे यांचे लक्ष नसल्याची संधी साधून गल्ल्यातील रोकड आणि दोन मोबाइल संच असा एक लाख ११ हजारांचा मुद्देमाल लांबविला. कामगार रोकड घेऊन पसार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक शीतल जाधव तपास करत आहेत.