पुण्यातील मंगल टॉकीज जवळ दबा धरून बसलेल्या तेरा जणांच्या टोळक्याने मध्यरात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगार नितीन म्हस्के याची कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सागर कोळोनटी उर्फ यल्ल्या वय ३२, मलिक तुंड्या वय २४, इमरान शेख वय ३२, पंडित कांबळे वय २७, विवेक नवघर उर्फ भोला वय २४, लॉरेन्स पिल्ले वय ३३ सुशील सूर्यवंशी वय ३०, मनोज ऊर्फ बाबा हावळे वय २५,आकाश गायकवाड वय २४, रोहन तुपधर वय २०, विवेक नवधरे वय २७,अक्षय साबळे वय २१ आणि विशाल भोले वय ३० या तेरा आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा… पुण्यातील म्हाडाच्या पाच हजार घरांची ऑक्टोबरमध्ये सोडत; ‘या’ तारखेपासून अर्ज विक्री-स्वीकृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील मंगल टॉकीज येथे मयत नितीन म्हस्के मित्रा सोबत गदर २ सिनेमा काल रात्री पाहण्यास गेले होते. सिनेमा पाहून झाल्यावर रात्री १ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून सिनेमागृहाच्या आउट गेट जवळ येताच दबा धरून बसलेल्या १३ जणांनी नितीन म्हस्के याच्यावर कोयता,पालघन या धारदार हत्याराने वार केले. या घटनेत नितीन म्हस्के याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर घटना स्थळावरून आरोपी पसार झाले आहे.या सर्व आरोपीचा शोध आहे.तर मयत नितीन म्हस्के आणि आरोपीमध्ये काही दिवसापूर्वी वाद झाला होता.या वादातून नितीन म्हस्के यांचा खून करण्यात आल्याची माहिती समोर येत असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.