पुणे : पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करून एकाने तिचा गळा आवळून खून केल्याची घटना गोखलेनगर परिसरात घडली. पत्नीचा खून करून पसार झालेल्या तरुणाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेश्मा चंदर पंतेकर (वय ३०, रा. जनता वसाहत, जनवाडी, गोखलेनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चंदर अशोक पंतेकर (वय ३३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राहुल राजू मंजाळकर (वय २४, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेश्मा आणि चंदर यांचा बारा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना बारा वर्षांचा मुलगा आहे. काही महिन्यांपासून चंदर पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन छळ करत होता. तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. त्यामुळे रेश्मा माहेरी गेल्या होत्या. १९ जानेवारी रोजी चंदरने रेश्माशी संपर्क साधला. माझी चूक झाली आहे. तू घरी ये, असे त्याने सांगितले. त्यानंतर रेश्मा घरी आल्या.

Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या
police case marathi news, prithvi shaw marathi news
‘पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्या’, पृथ्वी शॉविरोधात गुन्हा न नोंदवल्याचे प्रकरण
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

हेही वाचा…‘ओळखपत्रावरील ठिपका’ वादात, शिक्षण विभागाच्या परिपत्रकावर टीका

बुधवारी (२४ जानेवारी) राहुलने चंदरशी संपर्क साधला. तेव्हा रेश्मा कामावर गेल्याचे त्याने सांगितले. संशय आल्याने रेश्माचे वडील तिच्या घरी आले. तेव्हा रेश्मा बेशुद्धावस्थेत पडली होती. पंख्याला ओढणी बांधण्यात आल्याचे आढळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी चंदर पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.