शाळकरी मुलावर ब्लेडने वार करुन त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना पर्वतीदर्शन भागात घडली. या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शाळकरी मुलाच्या आईने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा वर्षीय शाळकरी मुलगा सिंहगड रस्ता भागात राहायला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी शाळकरी मुलाच्या ओळखीचे आहेत. मुलगा शाळेतून घरी निघाला होता. त्या वेळी सदाशिव पेठेतील ना. सी. फडके चौकात आरोपींनी त्याला अडवले.
हेही वाचा >>>पुणे : पावसाळी गटाराच्या क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शहर तुंबले
आरोपींनी शिवीगाळ करुन मुलाच्या डोक्यात गज मारला. त्यानंतर त्याला धमकावून दुचाकीवरुन पर्वती दर्शन भागात नेले. त्याच्या हातावर ब्लेडने वार करण्यात आले. शाळकरी मुलाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पुरी तपास करत आहेत.