पुणे: नगर रस्त्यावरील वाघोलीमध्ये शाळकरी मुलीचा वडिलांनीच कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना घडली. घटनेनंतर वडील पसार झाले असून, त्यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून वडिलांनी मुलीचा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अक्षता फकिरा दुपारगुडे ( वय १५, सध्या रा. वाघोली, मूळ रा. सोलापूर) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. उपचारासाठी तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या काकाने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अक्षताचे वडील बांधकाम मजूर आहेत. आई गृहिणी आहे. ती वाघोलीतील एका शाळेत शिकते. अक्षताची आई घरकामासाठी सकाळी बाहेर पडली. त्यावेळी वडिलांंनी तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात वडिलांनी तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या घटनेत ती गंभीर जखमी झाली होती.

Pune, father son duo, cycle ride, Pandharpur, 203 km, Hadapsar, physical health, environmental conservation, cycling journey
शहरबात : पिता-पुत्र जोडीची सायकलवरून पंढरीची वारी
monkey attack, kolhapur, Student,
माकडाच्या हल्ल्यात कोल्हापुरात विद्यार्थी जखमी
gondia, boy died, drowning, mine,
गोंदिया : मुरमाच्या खाणीतील खड्ड्यात आंघोळ करणे जिवावर बेतले; मुलाचा बुडाल्याने मृत्यू
24-Yr-Old Woman Accuses Colleague Of Molestation During Badlapur Hiking Trip
२४ वर्षीय महिलेचा बदलापुरात विनयभंग, ऑफिसमधल्या सहकाऱ्यावर केला आरोप
Malegaon, daughters, died,
वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुलींसह तिघांचा अपघातात मृत्यू
Girl dies after being hit by a Citylink bus in nashik
सिटीलिंक बसच्या धडकेने बालिकेचा मृत्यू, आजोबा जखमी
Mumbai, girl, hit, school bus,
मुंबई : शाळेच्या गाडीने धडक दिलेल्या मुलीचा अखेर मृत्यू
Two minor girls who came for the exam were molested by the old house owner
परिक्षेसाठी दोन अल्पवयीन मुली नागपुरात आल्या; ८० वृद्ध घरमालकाने अश्लील चाळे करून…

हेही वाचा… विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यात सोनसाखळी चोरणारी टाेळी गजाआड

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक आणि रहिवाशांनी तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. मुलीचा खून करून वडील पसार झाले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. लोणीकंद पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.