गोष्ट ऐकायला प्रत्येकालाच आवडते. त्यामुळे शाळेतील अभ्यासक्रम रंजक गोष्टींच्या रुपात आणण्याचा अनोखा प्रयत्न बालाजी जाधव या शिक्षकाने केला आहे. इतकेच नाही, तर त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही पाठ्यपुस्तकातील धड्यांच्या स्वतंत्र गोष्टी तयार केल्या असून, प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वतःच्या पन्नास ते सत्तर गोष्टी तयार झाल्या आहेत.

हेही वाचा- पुण्यात जातपंचायतीच्या निर्णयामुळे कुटुंब २३ वर्षांपासून बहिष्कृत; जातीत परत घेण्यासाठी सव्वा लाखांचा दंड; पंचाच्या विरोधात गुन्हा दाखल

साताऱ्यातील विजयनगरच्या जिल्हा परिषद शाळेत बालाजी जाधव कार्यरत आहेत. विजयनगर शाळा एकशिक्षकी आहे. त्यामुळे पहिली ते चौथीच्या चाळीस विद्यार्थ्यांना ते एकटेच शिकवतात. सर्व विद्यार्थ्यांना शिकवणे अडचणीचे होत असल्याने विद्यार्थ्यांना शिकवलेले चांगल्या रितीने समजावे म्हणून पाठांच्या गोष्टी तयार करून सांगायला त्यांनी सुरुवात केली. काही आठवडे गोष्टी सांगितल्यावर विद्यार्थ्यांना चांगले आकलन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी मुलांना पाठांवर गोष्टी तयार करायला सांगितले. त्यानुसार तीन आठवड्यात मुलांनी स्वतःच गोष्टी तयार केल्या. मुले गोष्ट तयार करून, लिहून, वाचायला आणि इतरांना सांगायला लागली. गोष्टींचा हा उपक्रम जुलै ते डिसेंबर या कालावधीत राबवण्यात आला.

हेही वाचा- ‘दौलतजादा’ रोखण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचा पुढाकार; प्रकल्पग्रस्तांना जमिनींच्या बदल्यात मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या सदुपयोगासाठी शिबिरे

उपक्रमाबाबत बालाजी जाधव म्हणाले, की गोष्टीच्या माध्यमातून मुलांचे आकलन वाढले, त्यांची क्षमतावृद्धी झाली. गोष्ट लिहिण्यासाठी राजीव तांबे, नामदेव माळी अशा लेखकांनी मुलांना आभासी पद्धतीने मार्गदर्शन केले. त्याचा फायदा होऊन मुले अल्पावधीतच स्वतः गोष्टी लिहू लागली. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या क्षमतेनुसार पन्नास ते सत्तर गोष्टी लिहिल्या. इतरांना सांगायला, वहीत लिहायला शिकले. त्यामुळे शिकणे आणि शिकवणे सुलभ झाले. विद्यार्थी आता दोन-तीन शब्दांवरूनही गोष्ट तयार करतात. विद्यार्थ्यांमध्ये लेखन, संभाषण कौशल्य विकसित झाले.

हेही वाचा- नव्या संगणकप्रणालीचा म्हाडा सोडतीला फटका? घरांसाठी ६० हजारांपैकी केवळ १८७१ अर्ज मंजूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोष्टी ऑनलाइन…

विद्यार्थ्यानी तयार केलेल्या गोष्टी शिक्षणभक्ती या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यभरातील अन्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही त्या पाहता, ऐकता येतील. गोष्टींचा उपक्रम अन्य शाळांमध्ये राबवणेही फायदेशीर होऊ शकते, असेही जाधव यांनी सांगितले.