पुणे : माहेरहून सहा लाख रुपये आणण्याची मागणी करणाऱ्या पतीच्या छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणीकंद भागात घडली. या प्रकरणी पतीसह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीता रमेश जाधव (वय ३४, सध्या रा. भावडी, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा. परतूर, जि. जालना) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती रमेश जाधव, सासरे प्रभाकर, सासू कमलाबाई, दीर गणेश, सुरेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश आणि गीता यांना दोन मुले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रमेश गीताकडे दुचाकी आणि जागा खरेदीसाठी माहेरहून सहा लाख रुपये आणण्याची मागणी करत होता. गीताने माहेरहून पैसे न आणल्याने तिचा छळ करण्यात आला. छळाला कंटाळून गीताने गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक एस. वाय. राजगुरु तपास करत आहेत.