स्थानिक आमदार व खासदारांना डावलून त्यांच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांवर परस्पर निर्णय घेण्याचा चुकीचा आणि दुर्देवी पायंडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाडला जात आहे, अशी खंत शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> मद्य पिऊन त्रास दिल्याने लहान भावाचा गळा दाबून खून ; कोंढवा भागातील घटना

शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विषयांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नुकतीच मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शिंदे गटातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव व माजी आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. या मतदारसंघाचे खासदार डॉ. कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाचही आमदारांना बैठकीचे निमंत्रण नव्हते.या पार्श्वभूमीवर, खासदार डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा >>> पुणे : सेवा पंधरवड्यानिमित्ताने १२५ विविध दाखले वाटप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. कोल्हे म्हणाले, ‘लोकशाहीत नको तो पायंडा मुख्यमंत्री पाडत आहेत. लोकनियुक्त कोणत्याही लोकप्रतिनिधीला या बैठकीचे निमंत्रण नव्हते. एकप्रकारे आम्हाला निवडून दिलेल्या मतदारांचा हा अपमान आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून ते दुर्देवी राजकारण करत आहेत. ते त्यांनी करू नये. केवळ राजकारण न करता विकासाचा दृष्टिकोन ठेवून शाश्वत पाऊले उचलली पाहिजे’ ‘ज्यांनी १५ वर्षे शिरूरचे प्रतिनिधित्व केले, त्यांनी काही ठोस काम केले नाही, त्यांनी माझ्यावर टीका करणे संयुक्तिक नाही. सध्याच्या राजकीय परिस्थितीत आपण कोठे आहोत आणि कोणाच्या बाजूने बोलले पाहिजे, हेच ज्यांना ठावून नाही, त्यांच्याविषयी न बोललेले बरे, असे खासदार कोल्हे यांनी स्पष्ट केले.