लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: विषारी औषध प्यायल्याची ध्वनिचित्रफीत मोबाइलवर पाठवून प्रियकराने तरुणीला धमकी दिल्याने तरुणीने सासवड रस्त्यावरील एका लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रियकराच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
Cops daughter commits suicide by making audiotape before suicide
मुंबई : आत्महत्येपूर्वी ध्वनीचित्रफीत तयार करून पोलिसाच्या मुलीची आत्महत्या

या प्रकरणी अक्षय अरुण जोरे (रा. भेकराईनगर, हडपसर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २१ वर्षीय तरुणी कोंढवा भागात राहायला होती. तिचे आरोपी अक्षयशी प्रेमसंबंध होते. अक्षय तिला विवाहासाठी धमकावत होता. माझ्याशी विवाह न केल्यास मी आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने तिला दिली होती.

हेही वाचा… उच्च शिक्षण संस्थांमध्ये आता ‘कमवा आणि शिका’ योजना, यूजीसीची शिफारस

आरोपी अक्षयने मोबाइलवर विषारी औषध पिऊन आत्महत्या करत असल्याची ध्वनिचित्रफीत पाठविली होती. त्यानंतर तरुणी घाबरली. अक्षयने आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होईल, अशी धमकी तरुणीला दिली होती. सासवड रस्त्यावरील वडकी भागात एका लाॅजमध्ये तरुणीने खोली घेतली. तिने लाॅजमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर लाॅज व्यवस्थापकाने लोणी काळभोर पोलिसांना ही माहिती दिली.

हेही वाचा… पुणे: जिल्हा बँकेला ३५१ कोटींचा नफा; अजित पवार यांची माहिती

दरम्यान, तरुणीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. अक्षयने मुलीला धमकी दिली होती. त्याच्या धमकीमुळे तिने आत्महत्या केली, असे तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करत आहेत.