सैन्य दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला विरोध, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईच्या निषेधार्थ पश्चिम महाराष्ट्र युवक काँग्रेसने आज (शनिवार) भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनामुळे काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगीही होऊन तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, सरचिटणीस प्रथमेश आबनावे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहुल शिरसाठ यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस स्नेहल डोके, अनिकेत नवले, जयदीप शिंदे, अक्षय जैन, चिटणीस अनिकेत अरगडे, सातारा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ अमराळे, अक्षय माने, धनराज माने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. अखेर आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation in front of bjp office of youth congress in pune print news msr
First published on: 18-06-2022 at 21:54 IST