scorecardresearch

पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी अजय मोरे यांची नियुक्ती

मोरे यांनी तातडीने पदभार स्वीकारावा, तसेच देशमुख यांच्या नियुक्तीचे स्वतंत्र आदेश प्रसृत करण्यात येतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Pune Collectors Office
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय (संग्रहित छायाचित्र)

पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अजय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव माधवी वीर यांनी प्रसृत केले.

हेही वाचा- आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी स्वत: कधी…”

मोरे यांना अपर जिल्हाधिकारी या पदावर पदोन्नती देऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (मुंबई) येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीने पाठविण्यात आले होते. येथील कार्यकाळ संपल्यानंतर मोरे यांना पुन्हा महसूल विभागात सामावून घेण्यात आले होते. मात्र, त्यांना प्रतिक्षेत ठेवण्यात आले होते. आता त्यांची पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून देशमुख यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. मोरे यांनी तातडीने पदभार स्वीकारावा, तसेच देशमुख यांच्या नियुक्तीचे स्वतंत्र आदेश प्रसृत करण्यात येतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-12-2022 at 23:19 IST
ताज्या बातम्या