अजित पवार यांची रोखठोक भाष्य करणारे नेते म्हणून ओळख आहे. पहाटे सहा वाजल्यापासून ते कामाला लागतात. पुण्यात राष्ट्रवादी तसेच अजित पवार यांचे खास वर्चस्व आहे, असे म्हटले जाते. मात्र २०१७ साली झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार राष्ट्रवादीची सत्ता आणू शकले नाहीत. याबाबत अजित पवार यांनी भाष्य केले आहे. मी अनेक साध्या लोकांना नगरसेवक केलं, पदं दिली. मात्र ते माझ्या विश्वासाला पात्र ठरले नाहीत. त्या पराभवाची माझ्या मनात आजही खंत आहे, असे अजित पवार म्हणाले. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हेही वाचा >>> पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचे महत्त्वाचे भाष्य; म्हणाले, “भल्या सकाळी…”

मी अनेकांवर विश्वास टाकला होता, पण…

“२०१७ साली जो पराभव झाला त्याची खंत आजही माझ्या मनात आहे. मी साध्यासाध्या कार्यकर्त्यांना नगरसेवक केलं. त्यांना वेगवेगळी पदं दिली होती. जसा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास टाकला होता, अगदी तसाच विश्वास मी अनेकांवर टाकला होता. मात्र त्या व्यक्ती माझ्या विश्वासाला पात्र ठरलू शकल्या नाहीत,” अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा >>> शिवसेनेतील बंडखोरीवर अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंना सांगितले होते, पण…”

त्या शहराने मला १९९१ साली खासदार केले

“महानगरपालिका झाल्यापासून ते २०१७ पर्यंतचा काळ पाहिला तर पिंपरी चिंचवड येथे भाजपाचे जास्त नगरसेवक निवडून आले नाहीत. तेथे नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. काँग्रेस एकत्र असताना त्या शहराने मला १९९१ साली खासदार केले. सहा महिन्यांपासून मी खासदार होतो. मात्र तेव्हापासून या शहराशी माझे एक नाते निर्माण झाले. या शहराबद्दल मला एक प्रेम वाटायला लागले. तेव्हा पिंपरी चिंचवड पालिकेसाठी ६२ ते ६४ जागा होत्या. मात्र तेव्हा ३२ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. ३० जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले होते. या सर्व नगरसेवकांना एकत्र केले होते आणि पाच वर्षांसाठी कारभार चालवला होता,” अशी आठवण अजित पवार यांनी सांगितली.

हेही वाचा >>> सत्यजित तांबेंच्या बंडखोरीवर नाना पटोलेंचे महत्त्वाचे विधान, भाजपाचा उल्लेख करत म्हणाले; “आमचा एक नेता नेला, आम्ही नाशिकमधून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी चिंचवड हा मिनी भारत आहे, येथे…

“त्यांनी माझ्या जवळचे बरेच लोक फोडले. शरद पवार यांनी हिंजवडी निर्माण केल्यानंतर आयटी भागात काम करायला आलेला वर्ग वाकड या भागात राहायला आला. पिंपरी चिंचवड हा मिनी भारत आहे. येथे अहमदनगर, सोलापूर, बीड या दुष्काळी भागातील लोक कामाच्या निमित्ताने आले. परंतु उद्योग वाढत असताना येथे परराज्यातील लोकही आले. येथे वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक राहायला आले. आयटीचा जो मतदार आला त्या वर्गात मोदींची जबरदस्त हवा होती. ते लोक उमेदवाराचे नावही वाचत नव्हते. ते फक्त कमळाचे बटण बघायचे आणि मतदान करायचे. त्यामुळे अनेक लोक मोदी लाटेत निवडून आले,” असे अजित पवार यांनी सांगितले.