देशाचे गृहमंत्री आणि भाजपाचे चाणक्य म्हटले जाणारे अमित शाह आज ५७ वर्षांचे झाले आहेत. गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने देशातील दिग्गज नेते आणि भाजपाचे अनेक मोठे नेते अमित शहा यांचे अभिनंदन करत आहेत. अमित शाह यांना विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी देखील गृहमंत्री अमित शाह यांच्या वाढदिवसाबाबत भाष्य केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दर आठवड्याप्रमाणे शुक्रवारी पुण्यात घेतलेल्या करोनाच्या परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुण्यातील करोनाच्या सद्य परिस्थितीविषयी माहिती दिली. यानंतर त्यांना माध्यमांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा वाढदिवस असल्याचे म्हटले त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,” असे उत्तर अजित पवार यांनी दिले. त्यावर पत्रकारांनी एवढ्याच शुभेच्छा म्हटल्यावर आता काय भाषण करु मग असे म्हटले आहे.

rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

याआधी खासदार अमोल कोल्हे यांनी देखील गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त खास व्हिडिओ ट्वीट केलं आहे. हे ट्वीट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. अमोल कोल्हे यांनी ट्वीट केलेला हा व्हिडिओ हिंदी भाषेत आहे. त्याद्वारे त्यांनी अमित शाह यांना उपरोधिक शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“माननीय केंद्रीय गृहमंत्री श्रीयुत अमितभाई शहा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पेट्रोल, डिझेलच्या किंमतींप्रमाणे तुम्ही तुमचे वयाचे शतक पूर्ण करा. ज्याप्रमाणे खाद्यतेलांच्या किमती सतत वाढत आहेत, त्याचप्रमाणे तुमच्या कर्तव्याचा आलेखही वाढला पाहिजे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.