पुण्यातील टेकडी येथील वन उद्यानामधील विविध विकास कामांची पाहणी आणि लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपा नेत्यांच्या वादावर प्रतिक्रिया दिली आणि महाविकास आघाडी सरकार पडणार, या भाजपाच्या दाव्यालाही उत्तर दिलं.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्याकडून एकमेकांना शिव्या दिल्या जात आहे, यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार म्हणाले की, “दोघांनी तारतम्य ठेवले पाहिजे. हे आरोप-प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी थांबले पाहिजेत. आमच्या बद्दल बोलणारे देखील काही वाचाळवीर आहेत. त्यांच्याबद्दल मी अवाक्षर देखील बोललो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच आपलं काम भलं आणि आपण भलं, असं माझं आहे. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी आहे. पण दोन्ही बाजूने हे थांबलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही. ही आपली संस्कृती नाही, त्यामुळे हे सगळं थांबवा,” असं आवाहन त्यांनी केलं.

पुणे: तळजाई टेकडीवरील घाणीवरून अजित पवारांचा पुणेकरांना चिमटा; म्हणाले, “कुत्र्याला घरी गादीवर…”

“रशियाकडून युक्रेनवर हल्ला झाला आहे. त्यामध्ये आपल्या येथील विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यावर ते म्हणाले की, प्रत्येक देशाने पुढे जावे, पण युद्ध करुन कोणी पुढे जाऊ नये. पण आज तेथील परिस्थिती लक्षात घेता, तेथून विद्यार्थी देशात आणि राज्यात आणण्याच्या दृष्टीने संवाद साधला जात आहे. आज जवळपास ३२ विद्यार्थी दिल्लीला येत असून आज दुपारी मुंबईला देखील २४० विद्यार्थी परत येतील,” असं त्यांनी सांगितलं.   

युक्रेनमध्ये अडकली लोणावळ्याची मोनिका; लेकीच्या चिंतेत आई वडिलांनी देव ठेवले पाण्यात

दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपाकडून सरकार पाडण्याच्या दाव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. सरकारला कोणताही धोका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. “गेल्या सव्वा दोन वर्षापासून भाजपाकडून ही वक्तव्ये केली जात आहे. परंतु अजून सरकार पडलेलं नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली, तेव्हापासून भाजपाकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत. जोपर्यंत १४५ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी आहे आणि जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे तीन पक्ष एकत्र आहे, तोपर्यंत हे सरकार चालणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे,” असं अजित पवार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar slams bjp and reaction on shivsena bjp conflict svk 88 hrc
First published on: 26-02-2022 at 11:08 IST