मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ज्येष्ठअभिनेते नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊसवर जाऊन गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही आज सकाळी साडेसातच्या सुमारास पाटेकर यांच्या फॉर्मवर जाऊन भेट घेतली.
हेही वाचा >>> पुणे : विसर्जन दिवशी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजार सुरूच
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
गणरायाच्या दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे हे काल नानांच्या फार्म हाऊसवर गेले. त्या ठिकाणी नानांनी स्वतः तयार केलेल्या पिठले – भाकरीचा आस्वाद त्यांनी घेतला. शिंदे आणि नाना यांच्यातील भेटीने वेगवेगळे तर्कवितर्क करण्यात येत असताना, अजित पवार यांनीही नानांची भेट घेऊन सुमारे दोन तास चर्चा केली. यावेळी त्यांनी फार्म हाऊसवर फेरफटका मारून तेथील शेती, फळबागा, जनावरांचा गोठा याबाबतची माहिती घेतली.