पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये राज्य ऑलम्पिक स्पर्धेच उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते हा उद्धाटन सोहळा पार पडला. मात्र, या कार्यक्रमादरम्यान एक वेगळीच गोष्ट दिसून आली. उद्धाटनानंतर अजित पवार उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव ठेवलेल्या खुर्चीत बसलेले दिसून आले. अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचे बघून अनेक चर्चांना उधाण आलं होतं.

हेही वाचा- “तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली, मग उर्फीला का नाही?”, चित्रा वाघ यांचा महिला आयोगाला सवाल

NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये आज राज्य ऑलम्पिक स्पर्धेच्या उदघाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान रंगमंचावर मान्यवरांसाठी त्यांच्या नावाचे लेबल लाऊन राखीव खूर्च्या ठेवण्यात आल्या होत्या दुपारी साडेचार वाजता उद्धाटन सोहळा पार पडणार होता. मात्र, कार्यक्रम वेळेत सुरु न झाल्यामुळे क्रीडा व युवक सेवाचे सुहास दिवसे यांना अजित पवार हे वारंवार घड्याळ दाखवून उदघाटनासाठी वेळ होत असल्याचं सुचवत होते. दरम्यान, स्वागत गीत झाल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या हस्ते कार्यक्रमचं उदघाटन करत मशाल पेटवून शुभारंभ केला. पुढील कार्यक्रमाला वेळ होत असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघून गेले. फडणवीस गेल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शेजारी ठेवण्यात आलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर येऊन बसले. अजित पवारांसाठी राखीव ठेवण्यात आलेली खूर्ची रिकामीच होती.

हेही वाचा- “तर मला प्रत्युत्तर द्यावे लागेल…” चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड संतापले

काही वेळानंतर अजित पवार भाषण करण्यासाठी उठले. तेवढ्यात बालेवाडी क्रीडा संकुलनातील दुसऱ्या एटीपी चॅम्पियनशिप पारितोषिक समारंभाला गेलेले फडणवीस परतले आणि आपल्या खुर्चीवर बसले. काही वेळासाठी का होईना मात्र, अजित पवारांना उपमुख्यमंत्र्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या खूर्चीवर बसलेलं पाहून अनेक चर्चांना उधाण आले आहे.