पुणे : माझ्या प्रचाराला अजितदादाच येणार असल्याचे सांगत विजय शिवतरे यांनी अजित पवार यांच्या कामाचे कौतुक केल आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे जिंकून येणार नाहीत, असेही ते म्हणाले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांना खुली धमकी दिली होती. तू निवडून कसा येतो, तेच बघतो.अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मी ठरवलं तर एखाद्याला आमदार होऊच देत नाही, असं विधान अजित पवारांनी शिवतारेंना उद्देशून केलं होतं. त्याप्रमाणे विजय शिवतारेंना पराभवालाही सामोरं जावं लागलं होत. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले होते. मात्र सहा महिन्यांपूर्वी अजित पवार हे शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि उपमुख्यमंत्रीपदी विराजमान देखील झाले. तर त्याही पुढे जाऊन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील झाले. त्याच दरम्यान शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि विजय शिवतारे या दोन्ही नेत्यांमध्ये चांगल्या प्रकारे संवाददेखील पाहण्यास मिळाला. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटल्याचे दिसून आले. या सर्व घडामोडींदरम्यान आज पुणे जिल्ह्याचा महायुतीचा मेळावा झाला. त्या मेळाव्यानंतर विजय शिवतारे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. अनेक राजकीय घडामोडींबाबत त्यांनी भाष्यदेखील केले.

हेही वाचा – डेंग्यू, हिवतापावर अद्ययावत उपचार कसे करावेत? डॉक्टरांनी गिरवले धडे…

अजित पवार महायुतीबरोबर आल्याने आगामी निवडणुकीत तुमची अडचण होणार का ? या प्रश्नावर विजय शिवतारे म्हणाले की, महायुतीमध्ये अनेक नेते, पक्ष सहभागी होत आहेत. देशाचे नाव सर्वदूर आणि विकास काम करणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मी राज्याचा विकास होण्याच्या दृष्टीने महायुतीमध्ये सहभागी झालो, असे विधान अजित पवार यांनी यापूर्वीच केले आहे. त्यानुसारच राज्यात अनेक ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे निवडणुकीबाबत सांगायचे झाल्यास, आता माझी काहीच अडचण होणार नसून माझ्या प्रचाराला अजितदादाच येणार असल्याचे सांगत विजय शिवतरे यांनी अजित पवार यांच्या कामाचे कौतुक केल.

हेही वाचा – डेंग्यू, हिवतापावर अद्ययावत उपचार कसे करावेत? डॉक्टरांनी गिरवले धडे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी लोकसभा निवडणुकीत ४५ जागा महायुती जिंकेल असे नेते मंडळींकडून सांगितले जात आहे. पण सर्व पक्षांनी प्रामाणिकपणे काम केल्यास सर्व ४८ जागा जिंकू आणि कोणीच काय एकट्या सुप्रिया सुळेदेखील जिंकणार नसल्याचे विजय शिवतरे म्हणाले.