पुण्यातील एस.पी. कॉलेज येथे १४ ते १६ सप्टेंबर २०२३ दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हेदेखील उपस्थित राहणार, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा – आरोग्य अधिकाऱ्यांच्या दिमतीला नवीन मोटारी अन् खर्च फक्त ३ कोटी ८६ लाख रुपये

हेही वाचा – गणेशोत्सवात १८०० ‘सीसीटीव्ही’ कॅमऱ्यांची पुण्यावर नजर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील आंबेकर म्हणाले की, देशातील अनेक भागांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात येत असते. त्याच पार्श्वभूमीवर यंदा एस.पी. कॉलेज येथे १४ ते १६ सप्टेंबर २०२३ दरम्यान बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. या बैठकीला देशभरातील ३६ विभागांतील २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सर्वांना सरसंघचालक मोहन भागवत हे मार्गदर्शन करणार आहेत. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हेदेखील उपस्थित राहणार आहेत. तसेच या तीन दिवसीय बैठकीत महिलांच्या समस्या, आपली संस्कृती, आपला देश, आपला धर्म यावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.