पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज, शुक्रवारी पुण्यात येणार असून, थोरले बाजीराव पेशवे यांच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासह अन्य कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.
शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेही या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे.त्याच्या अनावरणासह प्रशिक्षणार्थी कॅडेट आणि सैन्यातील अधिकाऱ्यांबरोबर शहा संवाद साधणार आहेत.
तसेच, कोंढवा बुद्रुक येथे जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरलाही ते भेट देणार असून, बाळासाहेब देवरस रुग्णालयाची पाहणी शहा यांच्याकडून शुक्रवारी करण्यात येणार आहे. पीएमएचआरसी हेल्थ सिटीच्या भूमिपूजन समारंभासही शहा उपस्थित राहणार आहेत.