लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शिरूरचे खासदार कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. ते राजकारणातील दुसरे संजय राऊत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी येथे केली. कोल्हे यांनी पाच वर्षात काय काम केले, हे दाखवावे, असे आव्हानही आढळराव यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही टीका केली.

आणखी वाचा- बारामतीमधून ‘शरद पवार’ निवडणूक रिंगणात…जाणून घ्या काय आहे प्रकार?

ते म्हणाले की, शिरूरच्या विद्यमान खासदारांनी पाच वर्षात काहीच काम केले नाही. मात्र त्यानंतरही त्यांची बडबड आणि पोपटपंची सुरू आहे. अजित पवार काही बोलले की त्यांची वचवच सुरू होते. कोल्हे यांची केवळ बडबड आणि घोषणाबाजी सुरू आहे. निष्ठेच्या गप्पा मारणाऱ्यांना पाच वर्षात काय काम केले हे दाखविता येत नाही. मी खासदार असताना केलेल्या कामाची उद्घाटने कोल्हे करत आहेत. पाच वर्षात ते मदारसंघात फिरकले नाहीती, मात्र त्यानंतरही निवडणूक लढविताना त्यांना लाज वाटत नाही, अशी टीका आढळराव यांनी केली