पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. सराईत गुन्हेगार आणि साथीदाराने गुलटेकडीतील डायसप्लॅाट परिसरात दुचाकींची तोडफोड करुन दहशत माजविली.भक्तिसिंग दुधानी (वय २३,रा.गुलटेकडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
हेही वाचा : पुण्याचे पालकमंत्री होणार का ? देवेंद्र फडणवीस म्हणाले…
दुधानी याचा साथीदार शक्तीसिंग दुधानी (वय २७) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी गुलटेकडीतील डायसप्लॅाट परिसरात दहशत माजवून दुचाकींची तोडफोड केली. याबाबत अनिल कांबळे (वय ३३ ,रा. गुलटेकडी, डायसप्लॉट) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे आणि दुधानी यांच्यात काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. कांबळे याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. कांबळे आणि त्याचे मित्र डायसप्लॅाट परिसरात रात्री गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपी दुधानी यांनी कांबळे याच्यावर कोयत्याने वार केले. दुधानी यांनी परिसरात दहशत माजवून दुचाकींची तोडफोड केली. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.