पुणे: वर्ल्ड वेगन डे म्हणजेच जागतिक शाकाहार दिनाच्या पूर्वसंध्येला व्हेगन इंडिया मूव्हमेंटतर्फे पुण्यातील कार्यकर्त्यांनी ‘फेस द ट्रूथ’ (सत्याला सामोरे जा) आणि लिबरेशन फाॅर ऑल (सर्वांसाठी मुक्ती) या ब्रीदवाक्याअंतर्गत प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात रविवारी जनजागृती मोहीम राबविली. त्याचप्रमाणे प्राण्यांना अन्नाचा आणि नागरिकांना त्यांना खायला देण्याचा अधिकार आहे, हा संदेशही फलकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी दिला.

हेही वाचा >>> पुणे: पोलीस भरतीची प्रतीक्षा कायम, उमेदवारांमध्ये निराशा

अन्न, वस्त्र, प्रयोग, मनोरंजन किंवा इतर कोणत्याही हेतूसाठी सर्व प्राण्यांचा वापर, शोषण, अत्याचार आणि क्रूरतेपासून मुक्त जगण्याचा मूलभूत अधिकार आहे, याविषयी या मोहिमेद्वारे जनजागृती करण्यात आली. संभाजी उद्यानाजवळ आयोजित या कार्यक्रमात व्हेगन इंडिया मूव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान करून हातातील लॅपटॉप आणि टॅबद्वारे विविध उद्योगांमध्ये प्राणी सहन करत असलेल्या भीषणतेची छायाचित्रे आणि चित्रफिती प्रदर्शित केल्या. माणसाच्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी प्राण्यांना तोंड द्यावे लागत असलेल्या भीषण वास्तवाची जाणीव नागरिकांना करून देणे आणि त्यांना शाकाहारी होण्यासाठी प्रवृत्त करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. आयोजक अमजोर चंद्रन, अभिषेक मेनन, प्रतीक राजकुमार यांच्यासह कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा >>> पुण्यात शिंदे गटाकडून बॅनरबाजी, ‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’ म्हणत उद्धव ठाकरेंना लक्ष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राणिजन्य पदार्थांचे सेवन न करणे, प्राण्यांवर चाचणी केलेली सौंदर्यप्रसाधने आणि इतर उत्पादनांवर बहिष्कार टाकणे, प्राण्यांची त्वचा आणि केसमुक्त पोशाख किंवा फॅशनची निवड करणे, प्राण्यांचा समावेश असलेली सर्कस न पाहणे, प्राणिसंग्रहालयांना भेट न देणे, पाळीव प्राणी खरेदी करण्याऐवजी प्राणी दत्तक घेणे, म्हणजेच प्राण्यांवरचे सर्व प्रकारचे शोषण नाकारण्याविषयी जनजागृती करण्यात आली.